Thursday, 17 June 2021

96

आंतून....मनाच्या गाभ्यातून हलवून टाकणारी प्रेमकथा!
-------------
काही लिहिण्याआधी सानियाला कोट्यवधी धन्यवाद कारण तिच्यामुळे मला आयुष्यात विलक्षण तरल..हळुवार क्षणांचा हा सिनेमा बघता आला...जगता आला...!!

बहुतेकांनी आयुष्यात कुणाना कुणावर जीव जडवलेला असतो...मनापासून प्रेम केलेलं असतं...अगदी शाळकरी वयापासून....

कधी चोरटे कटाक्ष...कधी माना वळवून हळूच बघणं...अगदी लाजून हासणे अन्...वगैरे..

आणि तिच्याकडनंही तसाच अबोल प्रतिसाद आला तर??...मग तर बघायलाच नको...सगळंच कसं गुलाबी..सोनेरी होऊन जातं...

मात्र काहींच्या आयुष्यात मनातलं ओठांवर यायच्या आत अचानक ताटातूट लिहिलेली असते...जीवघेणी ताटातूट..!

अशाच शाळकरी वयात अबोल प्रेमात असणा-या राम आणि जानकीची कथा. मल्याळम सिनेमा "96"

याचं नाव "96" कारण '96 बॕचचे ते प्रेमी पुढे वीसेक वर्षांनंतर रियुनियनच्या निमित्तानं एकमेकांसमोर येतात. 

...आणि मग त्यांच्या मनातली ती अव्यक्त घुसमट ज्या संयत तरल प्रकारे व्यक्त होत जाते ते उलगडत नेणारे प्रसंग केवळ लाजवाब! ...

संवेदनशील प्रेमाचा अलगद हृदयात घुसणारा आविष्कार...शारीर प्रेमाच्या खूप खूप पलीकडचा...

आप काटोंकी बाते करते हो
हमने तो फूलोंसे जख्म खाये है!.असं सगळं... :-(  

सगळीच स्टोरी इथे फोडत नाही कारण हा ज्याच्यात्याच्या दिलाचा मामला...प्रत्येकाला आणि प्रत्येकीला अंतर्मुख करणारी एक्केक फ्रेम...

अगदी हातांच्या निसटत्या स्पर्शातनं...तिने खाल्लेल्या डिशमधलं तिच्या उष्ट्या चमच्याने खाणं...आणि त्यातली त्याच्या तल्लीन खाण्यातनं दिसणारी शब्दातीत अनुभूती...व्वाह!

आपली प्रेममूर्ती इतक्या वर्षांनी भेटल्यावर तिचं निकट सान्निध्य असुनही त्याने तिला स्पर्शही न करणं..फक्त एकदा तिचा हात निरोपाच्या शेवटच्या टप्प्यांत कारमधून जाताना गिअर लीव्हरवर आसताना त्याने त्यावर आपली मूठ ठेवणं बस्स....त्या तेव्हढ्या स्पर्शांतनं खूप काही मिळणं...दोघांनाही... 

आणि शेवटची ताटातूट होताना त्याचा रडवेला चेहरा बघवत नसल्याने तिने फुटून फुटून आक्रंदत आपल्या हाताने त्याचा चेहरा झाकताना त्या वियोगाचे ते विदीर्ण करुन जाणारे क्षण...

खरंच या सिनेमाच्या एक्केक फ्रेमवर लिहावंसं वाटतंय...पण लिहिण्यापेक्षा मलाच पुनःपुन्हा यूट्युबवर त्या सर्व फ्रेम्स अनुभवत माझ्याच हृदयातला 'तो एक कप्पा' उघडून त्यात हरवून जावंसं वाटतंय...आणि मी तेच करतोय...

No comments:

Post a Comment