"I was a Male War Bride"!!
----------------
कालची रात्र या पिक्चरने वसूल केली!!!
हाॕर्वर्ड हाॕक्ससारखा भन्नाट डायरेक्टर, कॕरी ग्रँन्टसारखा धमाल अॕक्टर, जोडीला अॕन शेरीडॕनसारखी स्टेजवर गाजलेली अभिनेत्री आणि एक मजेशीर गुंतागुंतीचं कथानक ज्यात एका फ्रेंच आर्मी कॕप्टनला आपल्या लग्नानंतर, अमेरिकन लेफ्टनंट बायकोबरोबर अमेरिकेत जाताना, "अमेरिकन पब्लीक लाॕ 271" प्रमाणे (WarBride न्यायला परवानगी आसल्यामुळे), तिची 'spouse' याने की आपल्याच बायकोची 'बायको' बनून प्रवास करायला लागतो आणि मग एक मजेदार सिनेमा जन्माला येतो - १९४९ सालचा एक अत्रंगी मूव्ही -"I was a Male War Bride"!!
राॕजर चार्लिअरने १९४७ साली लिहिलेल्या "Male War Bride Trial to Army"ह्या कथेवर बेतलेला हा धमाल सिनेमा! दुस-या महायुद्धानंतरचा काळ! दोस्त राष्ट्रांपैकी फ्रेंच कॕप्टन हेन्री रोचार्ड (कॕरी ग्रँन्ट) जर्मनीत हायडेलबर्गवर एका मोहिमेसाठी आलाय. तो थेट जाऊन भेटतो तो आधीच्या मोहिमेत त्याच्याबरोबर असणा-या अमेरिकन लेफ्टनंट कॕथरिन गेट्सला (अॕन शेरीडॕन) तिचे कपडे परत करायला. इतर सर्व लेडी स्टाफसमोर त्याने असे बॕग उघडून धडाधड कपडे बाहेर काढून दिल्यावर तो स्टाफ आणि आपण प्रेक्षकही चक्रावतो. कॕथरिन तर खवळतेच त्याच्यावर...त्यांच्या गंमतीदार शाब्दिक चकमकींची सुरुवात या पहिल्याच सीनपास्नं सुरु होते.
या नवीन मोहिमेतसुद्धा लेफ्टनंट गेट्सच बरोबर असल्याचं पाहून तो चरफडतो पण रुल इज रुल!..बिचारा निघतो निमूटपणे तिच्याबरोबर, एका साईडकार लावलेल्या मोटरसायकलवर साईडकारमधेच बसून कारण लेफ्टनंटने कॕप्टनला घेऊन जाण्याच्या आॕर्डर्स असतात...
तो साईडकार मदधे बसल्याबसल्या ती सुसाट निघते पण साईडकार धड अटॕच्ड नसल्याने हा पठ्ठा तिथ्थेच जागेवर! 😄..मग दुसरी मोटरसायकल घेऊन त्यांचा प्रवास सुरु...रेल्वे क्राॕसिंगपाशी ते थांबले असताना तिची लिपस्टिक पडून फाटकापलीकडे जाते..ती त्याला काढायला सांगते..त्याचा हात पुरत नाही..म्हणून तिच्या सांगण्यावरुन तो फाटकाच्या बांबूवरून पलीकडे जायच्या प्रयत्नात असतानाच, रेल्वे निघून गेल्यामुळे फाटक उचललं जातं आणि त्याचबरोबर त्याला लटकलेला कॕप्टन हेन्रीसुद्धा हवेत!..इथनंच स्लॕपस्टिक काॕमेडीला सुरुवात...
पुढे त्यांचा मोटरसायकल बोटीत घालून प्रवास...बोट भरकटणं....अंधारात चांगला गुळगुळीत रस्ता सोडून खड्ड्यांनी भरलेल्या शेताडीच्या रस्त्यातनं जाणं..रात्री गावात लाॕजवर मुक्काम...तिथेही रात्रीचा तो धम्माल सीन...कुठल्याही स्त्री-पुरुष नात्यांत स्त्री ही नेहेमीच डाॕमिनेटींग असते ( ;-) ); तसंच या सिनेमातल्या प्रत्येक प्रसंगात घडत जातं आणि कॕथरिन म्हणेल तसं वागतावागता बिचा-या हेन्रीचा पोपट होत जातो...त्यांच्या दोघांमध्ये खटके उडत उडतच एका प्रसंगात गवताच्या गंजीत बाईक घुसून आतमधे दोघे असताना प्रथमच दोघांमधे जवळीकीचा क्षण...जगभर लौकीक असलेला "French kiss" अनुभवण्यातली तिची उत्सुकता आणि 'फ्रेंच' कॕप्टन हेन्रीकडून तिला लगोलग प्रात्यक्षिक!...आणि मग दोघांचं तिथेच मनोमीलन! :-D .,.त्यांचं जर्मनीत असल्यामुळे तीन प्रकारे लग्न!..
आणि हनिमूनच्या रात्रीच दुस-या ठिकाणी ट्रान्स्फरसाठी 15 मिनिटांत तयार होऊन निघण्याचे आदेश!..,तिला अमेरिकेत जायचं पण तो कसा जाणार?..तर अमेरिकन पब्लीक लाॕ 271" प्रमाणे युद्धकाळात सैनिकालाआपली वधु नेण्याची परवानगी असते..आणि मिलिटरीच्या फाॕर्ममधे बायको असा उल्लेख नसून 'spouse' असा उल्लेख असल्यामुळे, त्या पळवाटेचा आधार घेऊन लेफ्टनंट कॕथरीन रोचार्डची spouse म्हणून 'हेन्री' निघतो...म्हणजे प्रत्यक्षातल्या मिस्टर-रोचार्डची-बायको-असणा-या- कॕथरीनची-बायको म्हणून!...पण दोघांना प्रवास मात्र वेगवेगळा करायचा असतो..हेन्रीला इतर सैनिकांच्या बायकांबरोबर!!...आणि सिनेमातली पुढची धमाल सुरु होते... ;-)
आपल्या बायकोची बायको बनून निघालेल्या हेन्रीवर काय काय प्रसंग गुदरतात?..बोटीवरुन अमेरिकेपर्यंत ते जाऊ शकतात?..अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी हा १९४९ सालचा मजेशीर सिनेमा जरूर बघा!..कॕरी ग्रँन्टची कमाल अॕक्टींग आणि अॕन शेरीडनची उत्तम साथ! (यातल्या दोनतीन प्रसांगात ती खळाळून हसते..तिचं ते हसणं..तो साऊंड मला ज्यामच आवडला..!) 😍
No comments:
Post a Comment