Thursday, 17 June 2021

द बाईज फ्राॕम ब्राझील

बाॕईज फ्राॕम ब्राझिल
------------
सध्या रोज मध्यरात्री एक मूव्ही पाहणं सुरु आहे! काल रात्री "द बाॕईज फ्राॕम ब्राझिल" पाहिला!

ग्रेगरी पेक चा मी पाहिलेला पहिलाच खलनायक- डाॕ. योसेफ मेंगले!! त्याने ब्राझीलच्या एका बेटावरच्या गुप्त क्लिनिकमधे हिटलरचे DNA वापरुन ९४ क्लोन्स तयार केलेत सरोगेट आयांकडून आणि त्याला पुन्हा एकवार नाझींचं राज्य आणण्याची आसुरी इच्छा आहे! पण त्या सर्व क्लोन्सच्या जन्मदात्या बापांना (जे आता ६५ वर्षांचे झालेत) तो एकामागोमाग एक ठार करत सुटलाय! कारण त्याला त्या एकसारख्याच दिसणा-या, मोठ्या होत चाललेल्या काळ्याभोर केसांच्या, निळ्याशार डोळ्यांच्या गो-या मुलांना हिटलरने अनुभवलं तसंच सगळं बालपण आणि आयुष्य अनुभवायला लावत मोठं करायचंय..तरच कुणी हिटलर बनू शकेल...त्यासाठी अर्थातच ते सगळे ९४ बाप मरणंही आवश्यकच!! आणि त्यांचे एकापाठोपाठ एक थंड डोक्याने खून होणं सुरु होतं!...

ह्या 'आॕश्वित्झचा क्रुरकर्मा' म्हणून गाजलेल्या, डाॕक्टरचा प्लॕनचा सुगावा लागतो एझ्रा लिबेरमन ह्या नाझींच्या मागावर आसणा-या एजंटला - सर लाॕरेन्स आॕलिव्हिए!! पण त्याला फोन करुन ती माहिती देणा-या बॕरी कोह्लरची (स्टीव्ह गुटेनबर्ग) तो बोलत असतानाच हत्या होते...

लिबेरमन निघतो डाॕक्टर मेंगलेच्या मागावर... अशाच एका लहान मुलाच्या (भावी हिटलर?) बापाला वाचवण्यासाठी तो पोहोचेपर्यंत डाॕक्टर त्या बापाला मारण्यात यशस्वी होतो आणि दोघं समोरासमोर येतात. त्यांची झटापट चालू असतानाच तो निळ्या डोळ्यांचा मुलगा तिथे पोहोचतो...त्याचे वखवखलेले घरातले हिंस्र कुत्रे वाट बघतायत झडप घालून लचके तोडत समोरच्याला संपवण्याची!!..पुढे काय होतं?

मस्त थ्रीलर मूव्ही!! ग्रेगरी पेक आणि सर लाॕरेन्स आॕलिव्हिएसाठी बघाच!

No comments:

Post a Comment