Thursday, 17 June 2021

द लास्ट टाइम आय साॕ पॕरीस!

द लास्ट टाइम आय साॕ पॕरीस!
-----------------------
आपण युद्ध पाहिलेलं नाही. युद्धाची झळ अनुभवलेली नाही. आपल्या जवळचे कुणी युद्धात गेलेले नाहीत. त्यामुळे तब्बल चार वर्षं चालणारं महायुद्ध संपल्यावर जो हृदयात न मावणारा आनंद काय असू शकतो ते आपल्याला ठाऊकच नाही! दुस-या महायुद्धाची अखेर! आणि पॕरीसमधे जल्लोष. लाख्खो लोकं आनंदोत्सव साजरा करायला रस्त्यावर. सगळेच सगळ्यांचं अभिनंदन करतायत, कुणीही कुणालाही आलिंगन देतायत. कुणीही मुली कुणालाही चुंबनं देतायत. हिटलरचा जुलूम संपलाय. आणि फक्त आनंद आणि आनंद!..त्या गराड्यातच चार्ल्स विल्स आहे. त्यालाही अशाच चुंबनांचा लाभ मिळतोय. त्याचं चुंबन घेऊन 'ती' गर्दीत नाहिशी होत्ये पण तिचा चेहरा तो विसरु शकत नाही...

पॕरीसमधे मिळालेल्या मैत्रिणीच्या, मेरियनच्या आमंत्रणावरुन तो तिच्या घरी पार्टीला जातो. तिचे बाबा जेम्स (वाॕल्टर पिजन) स्वतः पहिलं महायुद्ध लढलेले आहेत, आणि त्याच पार्टीत त्याला मेरीयनची बहिण दिसते हेलेन (एलिझाबेथ टेलर)!! तिचं चुंबन त्ययाला आठवतं आणि तिलाही!! आणि तो तिच्या प्रेमात पडतो. एलीझबेथ टेलर! लीझ! मूर्तीमंत ब्रिटीश लावण्य! थेट रुतणारे निळेशार डोळे! १९५४ सालचा हा मूव्ही! ती जेमतेम २२ वर्षांची असतानाचा! तिच्या प्रेमात कुणीही पडावं अशीच ती!

चार्ल्स आणि हेलेन लग्न करतात. (चार्ल्सला कल्पना नाही पण मेरीयनचं प्रेम जडलं होतं त्याच्यावर)....पुढे चार्ल्स आणि हेलेनला एक गोड मुलगीही होते. 

पण चार्ल्सच्या पत्रकारितेच्या जाॕबमधे त्यांचं धड चालत नसतं. अशातच हेलेनच्या वडिलांनी घेऊन ठेवलेल्या अमेरिकेतल्या जमिनीत आॕईल सापडतं..आणि ते मालामाल होतात. चार्ल्स जाॕब सोडतो.

हातात पैसा आल्यावरा घरी पार्ट्या सुरु होतात. सतत लिहिलेल्या लेखनाला प्रकाशकांकडनं नकार सहन करावा लागल्याने चिडचिडा झालेला चार्ल्स सास-याकडून/ बायकोकडून आलेल्या पैशावर पार्ट्या करायला लागतो. अशातच त्याला 'सावज गटवून, लग्न करुन घटस्फोट देऊन, नवनवीन लग्नं करणारी' सुंदरी लाॕरेन (इव्हा गॕबोर) भेटते . तो वाहावत जातो. इकडे हेलेनलाही एक टेनिस प्लेयर पाॕल लेन (राॕजर मूर) भेटतो. (राॕजर मूरचा हा पहिलाच सिनेमा ..यानंतर तब्बल २० वर्षांनंतर त्याने बाँण्ड साकारला तो १९७३ मधे!)

पुढे काय होतं? चार्ल्स-हेलेनचा संसार सुखाने चालू राहतो का? हेलेनला हवं असतं त्याप्रमाणे ते अमेरिकेत परत जातात का? याची उत्तरं हा मूव्ही बघूनच मिळतील.

जवळजवळ दोन तासांच्या या सिनेमाची शेवटची २० मिनीटं खूपच भावनिक!..आपण एव्हाना खूपच इन्व्हाॕल्व्ह झालेलो असतो या सिनेमात!..आणि मग हेलावून टाकणारा शेवट!...जरुर पाहा यूट्युबवर आहे!

No comments:

Post a Comment