Monday, 14 June 2021

शुभा खोटे

"सायकल चॕम्पियन" : 
"ओम"ची लाघवी आज्जी!! 
---------------
"प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला, प्रेमाने मिटती मनाची अंतरे
प्रेमाने प्रेमाला पाहू चला…."  संदीप खरेची ही प्रेमकविता माझ्या आठवणीतली मराठी सिरियलच्या इतिहासातलं सर्वात सुंदर अर्थपूर्ण आणि गोड टायटल साँग ठरावं! 

त्यातल्या -- " … मनाशी बोलते जगाला जोडते - प्रेमाने जागते प्रेम नवे II प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित - प्रेमाला ठाऊक प्रेम हवे !!" ह्या ओळींच्या प्रेमात पडून ओम-ईशाची सिरियल वेड्यासारखी बघायला लागलो. आणि शुभा खोटेंची लाघवी प्रेमळ आज्जी खूपच भावली. वृद्धाश्रमातून ओमने प्रेमाने घरी आसरा दिल्यावर त्याच्यावर खऱ्या आज्जीसारखीच माया करणारी आज्जी शुभा खोटेंनी फारच छान साकारल्ये. कॉनव्हेंट मधून शिकून इंग्लिश लिटरेचर मध्ये ग्राज्युएट झालेल्या शुभाखोटेंचं मराठी वेगळं तरीही ऐकायला गोड वाटतं!!...

त्यांच्याकडे पाहताना एकदम त्यांचे ते सगळे जुने ग्रेट हिंदी सिनेमे आठवले. विशेषतः नूतन द ग्रेट बरोबरचे "सीमा" आणि "अनाडी" आणि अर्थातच अमिया चक्रवर्तींचा धम्माल " देख कबीरा रोया" …. शिवाय मेहमूद बरोबर गाजवलेली धुमाकूळ विनोदी जोडी!!… 

नंदू खोटे, दुर्गा खोटेंच्या घराण्याचे संस्कार लाभलेल्या शुभा खोटे लहानपणापास्नं टॉमबॉयीश होत्या! "सायकलिंग"ची त्यांना प्रचंड आवड आणि त्यातूनच एका स्पर्धेत फास्टसायकलिंग मध्ये रेकॉर्ड केल्यावर त्यांचे फोटो पेपरात झळकले आणि पुढे त्यातूनच त्यांना "सीमा" मध्ये नूतन आणि बलराज साहनी सारख्या ग्रेटेस्ट अभिनेत्यांसमोर रोल मिळाला आणि खास त्यांच्यासाठी तो सायकलवरुन चोराच्या पाठालागाचा सीन...! 

आणि मग पुढे त्यांनी त्यांचं स्वतःचं स्थान निर्माण केलं. मेहमूद, धुमाळ बरोबरच्या त्यांच्या विनोदी भूमिका तुफान हिट्ट ठरल्या!! 

"सीमा, अनाडी, पेईंग गेस्ट, देख कबीर रोया, ससुराल, दिल तेरा दिवाना, भरोसा, घराना, दिल एक मंदिर" ---- कित्ती हिट्ट सिनेमे आणि मस्त गाणी!! 

आज त्यांची आठवण काढलीच आहे तर मला आवडणारं त्यांचं एक गाणं--> 

https://youtu.be/qQFz0EN3wLM

No comments:

Post a Comment