...........
हे गाणं साहीरने आरडीच्या चालीवर रचलं की कथेतली गाण्याची सिच्युएशन समजून साहीरने हे लिहिलं आणि मग आरडीने चाल बांधली हे आता कळायला मार्ग नाही आणि ती आठवण सांगायला साहीर, आरडी आणि मनमोहन देसाई तिघेही हयात नाहीत, पण या भलत्याच सोप्या मुखड्यामधून साहीरने फार सुंदर अनुभूती मांडल्ये नाही? ..
"तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूँही नही दिल लुभाता कोई..." खरंच आहे ना?..आयुष्याच्या वाटचालीत हज्जारो माणसं आपल्याला भेटतात, पण अगदी मोजकीच कुणी अशी आपलं दिल लुभावतात. आपल्या हृदयात घर करुन बसतात. आणि मग ती अशक्य केमिस्ट्री जुळायला, ती माणसं अशी मनात घुसायला त्याचं आणि आपलं "पहले का नाता कोई" असल्याशिवाय कसं होईल तसं?..
आणि मग मी जेव्हा अशा अतर्क्य प्रकाराला किंवा अशा incidence of coincidence ला काही कार्मिक देणी किंवा जन्मजन्मांतरीचे ऋणानुबंध म्हणतो तेव्हा काहींना पटतं तर काही माझी टिंगल करतात...पण मग असं आधी न पाहिलेलं, न भेटलेलं आणि त्यामुळे त्याच्या/तिच्या स्वभावाचा, आवडीनिवडीचा अजून पुरता थांगही न लागलेलं माणूस आपलं दिल का बरं लुभावतं?..
बरं, त्यासाठी त्या माणसाने अफाट सुंदर दिसणं, रुपाची मोहिनी पडणं जरुरी नसतं...त्या माणसाचं समोर आल्यावर मिळणारे वाईब्ज आपल्याला खूप काही सांगून जातात. त्याच्या/तिच्या पहिल्याच भेटीत हा आपला आहे/ही आपली आहे" असा फील आपसूकच येतो..कळतं आपल्या हृदयाला आणि मग होतं ते ट्रिंग ट्रिंग आंत कुठेतरी!
आणि तेच साहीरने त्या अगदी सोप्प्या ओळीतून सांगितलं नसेल?!!..नव्हे तसंच असतं ते!!...मग ही अनुभूती ज्यांच्या नशिबात असते ते भाग्यवान खरेच!!
या गाण्याविषयीचा एक गंमतीदार किस्सा घडला तो भारतापासून दूर आफ्रिकेच्या उत्तर भागातल्या, एके काळी फ्रेंचांची वसाहत असलेल्या मुस्लीम 'आल्जिरिया' देशात!!...
झालं असं की 1973 सालची ही फिल्म कशी कुणास ठाऊक पण इंग्लिश सबटायटल्सविना अल्जिरियन टीव्हीवरुन दाखवली गेली. अल्जिरियाच्या तमाम प्रेक्षकांना ती बेहद्द पसंत पडली, इंग्लीश किंवा अरेबिक सबटायटल्स नसल्याने डायलाॕग्ज तर समजत नव्हते, पण आरडी बर्मनच्या गाण्याच्या चाली त्यांना प्रचंड आवडल्या, विशेषतः शशी-शर्मिलाची केमिस्ट्री आणि त्यांचं हे गाणं "तेरा मुझसे है पहले का नाता कोई..." आणि त्यातलं धृपद "..जाने तूss या जाने नाss, माने तूss या माने नाss.. "..इतकं आवडलं की हिंदी भाषा येत नसूनही संपूर्ण अल्जिरियाला या गाण्याने मोहिनी घातली! लोकाग्रहास्तल "आ गले लग जा" सिनेमा अल्जिरियन टीव्हीवरुन वारंवार दाखवला गेला. त्याची स्टोरी आणि गाणी अल्जिरीयाच्या त्या वेळच्या पिढीला वेडावून गेली. आकर्षणाचा विषय ठरली!! आजही त्या पिढीतली मंडळी या सिनेमाचा उल्लेख "जानितूss" (जाने तू या जाने ना..ओळीवरुन) असाच करतात! गंमत म्हणजे यूट्यूबवर अल्जिरियन गायकाने त्याच्या पद्धतीने डफच्या साथीने गायलेलं हे गाणं आजही बघायला मिळतं.
या गाण्याचा आणखी एक किस्सा एका के. श्रीधरने सांगितलाय की तो फ्रान्समधे राहात असताना एका अल्जिरियन मित्राच्या घरी गेला होता. तो अल्जिरियन सहजच "जानितू"ची ट्यून शिट्टीवर वाजवत होता. त्यावर श्रीधरने हे अख्खं गाणंच म्हणायला सुरुवात केल्यावर तो अल्जिरियन मित्र हर्षातिरेकाने ओरडलाच!! आणि त्याने श्रीधरला फिल्मचं नाव विचारलं, श्रीधरने ते सांगितल्यावर तो म्हणाला की हा सिनेमा आमच्या अल्जिरियात प्रचंड लोकप्रिय आहे आणि त्याच्या लहानपणी जितक्यावेळा हा सिनेमा अल्जिरियन टीव्हीवर लागे तेव्हा रस्ते ओस पडत आणि लोकं टीव्हीला खिळून शशी- शर्मिलाचा हा सिनेमा पाहात असत....
माझ्याशी पहले का नाता असणायांसाठीचं माझ्या शशीचं गाणं!! ;-)
Mast...very well written.. I too believe ..
ReplyDelete