फुकट लस???...कायकू????
------------
तमाम भारतीयांना मोदीजी फुक्कट लस देतायत हा विचार पटलेला दिसतोय!..माझा विरोध आहे ह्याला. माझं म्हणणं ज्यांना दोन लसींसाठी ४०० रुपये मोजणं परवडू शकतं असे किमान ५० कोटी नक्की असतील ह्या एकूण ९२ कोटी एलीजीबल " > १८ मधे!"
तर त्यामुळे जमा होणा-या २४००० कोटींमधे ६७० कोटीला एक या रेटने आणखी ३६ राफेल घेता येतील ती घेऊन टाकावीत!
किंवा २३००० कोटींना एक असं आणखी एक विमानवाहू विक्रांत टाईपचं जहाज घेता येईल..
किंवा ४० कोटीला एक या रेटने ६०० स्पाय सॕटेलाईट्स आकाशात सोडता येतील जे कश्मीर, बंगाल, नक्षलाईट एरियातली जंगलं ह्यांवर नजर ठेवू शकतील (आधुनिक स्पाय सॕटेलाईट्सचे कॕमेरे पृथ्वीवरच्या कारचा नंबर टिपू शकतात...त्यांना माणसांच्या हालचाली टिपता येतीलच!)
किंवा ७०० कोटीला एक याप्रमाणे ३४ अपाची फायटर हेलीकाॕप्टर्स आर्मीसाठी विकत घेता येतील..
किंवा लेह-लडाखच्या ११०००+ फूटवरच्या उंचीवर काम करणा-या जवानांसाठी २ कोटीला एक या रेटने १२०००आॕक्सीजनची मशिन्स सेट अप करता येतील.
किंवा ३ लाख रुपयाला एक याप्रमाणे ३३००० कलाश्निकाॕव्ह रायफल्स घेऊन पोलीसांना/ जवानांना देता येतील.
म्हटलं तर देशाच्या रक्षणासाठी ५० कोटींनी केवळ ४०० रुपयाचे दोन डोस घेऊन खूप काही करता येईल...पण आम्ही फुक्कटच देणार म्हणून उदोउदो चालवणार!!
यही मार खा गया हिंदोस्तां..😳😲😧😥
No comments:
Post a Comment