Thursday, 17 June 2021

जॕकपाॕट

जॕकपाॕट
---------
बिल लाॕरेन्स (जेम्स स्ट्युअर्ट) हा मध्यमवर्गीय तरीही कुणाही बायकोला आवडेल असा नवरा. एका डिपार्टमेंट स्टोअरमधे मॕनेजर आहे. नोकरीत पैसा मनासारखा नाहीये तो जरा प्राॕब्लेमच, त्यामुळे थोडा स्वप्नाळू आहे गडी! पण एरवी बायकोवर प्रेम आहे. दोन मुलं आहेत. छोटंसं पण पुरेसं घर आहे. कार आहे. भाबडा आहे हा मनाने! त्याचा मालक चाललाय सुट्टीवर पण जाताजाता प्रमोशनची लालूच दाखवून चाललाय.

काहीसं ठरलेलं रुटीन चालू असताना अचानक बिल ला एक फोन येतो आणि एका रेडिओ प्रोग्रॕमच्या 'क्विझ काँन्टेस्ट'मध्ये त्याचं रँडम सिलेक्शन झाल्याची न्यूज मिळते. त्याने ठराविक वेळेत आलेला फोन उचलून, विचारलेल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलं तर त्याला 24000 डाॕलर्सचं बक्षिस मिळणार असतं. वर्षाला 7500 डाॕलर्स मिळवणा-या बिलसाठी तो मोठ्ठाच दिलासा असतो...पण गोची एकच असते की इतकी मोठी रक्कम पैशाच्या स्वरुपात न मिळता वेगवेगळ्या भेटींच्या स्वरुपात मिळणार असते. बिल आपल्या पत्रकार मित्राच्या मदतीनं कसाबसा ते क्विझ जिंकतो (ती सगळी धांदल मजेशीरच!) ;-) 

24000 डाॕलर्सचं बक्षिस ज्या स्वरुपात मिळायला सुरुवात होते ते क्रेझीच सगळं! एक हि-याची अंगठी, एक घोड्याचं तट्टू, पोर्टेबल स्विमिंग पूल, फ्रीझमधे मावणं अशक्य एवढं प्रचंड बीफ, अख्ख्या घराचं फर्निशिंग, 7500 सूपचे डबे, काही महागडी घड्याळं, न्यूयाॕर्कची ट्रीप आणि एका फेमस सुंदर आर्टिस्ट हिल्डा जोन्सकडून (पॕट्रिशिआ मेडिना) स्वतःचं पोर्ट्रेट काढून मिळणार...वगैरे.

घरात हे सगळं यायला सुरुवात झाल्यावर हैराण झालेल्या बिलला मोठा शाॕक बसतो जेव्हा त्याला कळतं की ते सगळं त्याच्या इनकममध्ये धरलं जाऊन, त्याला त्या सगळ्यांवर 7000 डाॕलर्सचा टॕक्स भरावा लागणारेय!..इतके पैसे आणायचे कुठून?..

आणि मग तो त्या वस्तू एकेक करुन विकायला काढल्यावर उडणारी धमाल म्हणजे या सिनेमाचा हायलाईट!..त्यात त्याला त्या देखण्या पोर्ट्रेट आर्टिस्टकडे हाॕटेलमध्ये सिटींग्जसाठी जावं लागल्यामुळे बायकोच्या मनातला संशय आणि निस्तरताना झालेला प्राॕब्लेम..घड्याळं विकताना बाॕसकडून मिळालेली खरडपट्टी आणि हि-याची अंगठी विकायला गेल्यावर भलत्याच बेटींगच्या रिंगमधे सापडून घडणारा तुरुंगवास...

या सगळ्यातनं बिल बाहेर कसा येतो? आर्टिस्ट सुंदरीमुळे बायकोच्या मनात उद्भवलेला संशय तो कसा दूर करतो? गेलेली नोकरी मिळते का?..या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा 1950 सालचा मजेदार सिनेमा एकदा बघायलाच हवा! जेम्स स्ट्युअर्टचं काम as usual मस्तच!जॕकपाॕट
---------
बिल लाॕरेन्स (जेम्स स्ट्युअर्ट) हा मध्यमवर्गीय तरीही कुणाही बायकोला आवडेल असा नवरा. एका डिपार्टमेंट स्टोअरमधे मॕनेजर आहे. नोकरीत पैसा मनासारखा नाहीये तो जरा प्राॕब्लेमच, त्यामुळे थोडा स्वप्नाळू आहे गडी! पण एरवी बायकोवर प्रेम आहे. दोन मुलं आहेत. छोटंसं पण पुरेसं घर आहे. कार आहे. भाबडा आहे हा मनाने! त्याचा मालक चाललाय सुट्टीवर पण जाताजाता प्रमोशनची लालूच दाखवून चाललाय.

काहीसं ठरलेलं रुटीन चालू असताना अचानक बिल ला एक फोन येतो आणि एका रेडिओ प्रोग्रॕमच्या 'क्विझ काँन्टेस्ट'मध्ये त्याचं रँडम सिलेक्शन झाल्याची न्यूज मिळते. त्याने ठराविक वेळेत आलेला फोन उचलून, विचारलेल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलं तर त्याला 24000 डाॕलर्सचं बक्षिस मिळणार असतं. वर्षाला 7500 डाॕलर्स मिळवणा-या बिलसाठी तो मोठ्ठाच दिलासा असतो...पण गोची एकच असते की इतकी मोठी रक्कम पैशाच्या स्वरुपात न मिळता वेगवेगळ्या भेटींच्या स्वरुपात मिळणार असते. बिल आपल्या पत्रकार मित्राच्या मदतीनं कसाबसा ते क्विझ जिंकतो (ती सगळी धांदल मजेशीरच!) ;-) 

24000 डाॕलर्सचं बक्षिस ज्या स्वरुपात मिळायला सुरुवात होते ते क्रेझीच सगळं! एक हि-याची अंगठी, एक घोड्याचं तट्टू, पोर्टेबल स्विमिंग पूल, फ्रीझमधे मावणं अशक्य एवढं प्रचंड बीफ, अख्ख्या घराचं फर्निशिंग, 7500 सूपचे डबे, काही महागडी घड्याळं, न्यूयाॕर्कची ट्रीप आणि एका फेमस सुंदर आर्टिस्ट हिल्डा जोन्सकडून (पॕट्रिशिआ मेडिना) स्वतःचं पोर्ट्रेट काढून मिळणार...वगैरे.

घरात हे सगळं यायला सुरुवात झाल्यावर हैराण झालेल्या बिलला मोठा शाॕक बसतो जेव्हा त्याला कळतं की ते सगळं त्याच्या इनकममध्ये धरलं जाऊन, त्याला त्या सगळ्यांवर 7000 डाॕलर्सचा टॕक्स भरावा लागणारेय!..इतके पैसे आणायचे कुठून?..

आणि मग तो त्या वस्तू एकेक करुन विकायला काढल्यावर उडणारी धमाल म्हणजे या सिनेमाचा हायलाईट!..त्यात त्याला त्या देखण्या पोर्ट्रेट आर्टिस्टकडे हाॕटेलमध्ये सिटींग्जसाठी जावं लागल्यामुळे बायकोच्या मनातला संशय आणि निस्तरताना झालेला प्राॕब्लेम..घड्याळं विकताना बाॕसकडून मिळालेली खरडपट्टी आणि हि-याची अंगठी विकायला गेल्यावर भलत्याच बेटींगच्या रिंगमधे सापडून घडणारा तुरुंगवास...

या सगळ्यातनं बिल बाहेर कसा येतो? आर्टिस्ट सुंदरीमुळे बायकोच्या मनात उद्भवलेला संशय तो कसा दूर करतो? गेलेली नोकरी मिळते का?..या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा 1950 सालचा मजेदार सिनेमा एकदा बघायलाच हवा! जेम्स स्ट्युअर्टचं काम as usual मस्तच!

No comments:

Post a Comment