---------------
आम्ही चित्पावन. कोब्रा!!
खरं म्हणजे आम्ही "कुणी" आहोत..म्हणजे ब्राह्मण आहोत...त्यातही 'कोब्रा' आहोत वगैरे भानगडी आमच्या बालपणी नव्हत्याच! किंबहुना 'जात' म्हणून काही असतं तेही त्यावेळी मीच काय, पण आमच्या आसपासच्या सोसायटीतल्या, एरियातल्या नव्हे अख्ख्या मुंबईतल्या सर्वदूर पसरलेल्या कुठल्याच मित्रांच्या डोक्यातही नव्हतं!
कुणीतरी एक चांगलं काम करणारा हवा म्हणून आम्ही त्याकाळी आमच्या एरियातल्या कुण्या माणसाला (बहुदा शिवसैनिक) स्थानिक पातळीवर निवडून देत असू आणि मग वर्षानुवर्षं विधानसभा/लोकसभेसाठी जनता (मृणालताई गोरे) /बीजेपीवाल्यांना (रामभाऊ नाईकांना) असं स्मरतंय! पण तेव्हा तो शिवसैनिक किंवा बीजेपीवाला 'ब्राह्मण' नाही किंवा वेगळे कुणी आहेत यांची यत्किंचितही तमा नसायची! आजही नाही!! पुढे मी पुण्यात शिफ्ट झालो आणि ब्राह्मणांचा केला जाणारा द्वेष प्रचंड जाणवायला लागला! दिसायला लागला! (सविस्तर लिहिन एकदा..!)
तसे तर माझे वडिल आरएसएसला जवळचे म्हणून मीसुद्धा काही वर्षं शाखेत जायचो. (गंमत म्हणजे संघात जाणा-या मुलांच्या हाफ प्यँन्टवरुन चिडवणा-या बहुतेकांना ढगळ हाफ प्यांन्टीतले दादा कोंडकेच हिरो म्हणून आवडायचे हे स्मरतंय आणि "आरएसएस"वाल्यांच्या हाफ प्यँटीची तेव्हा थट्टा करणा-यांची मुलं/नातवंडं/भाचे/पुतणे त्याहूनही ढगळ, वेड्याबिद्र्या बर्म्युडा त्यावेळी घालून फिरायचे आणि त्यांची पुढची पिढी आता त्याहून लांड्या शाॕर्ट्स किंवा कार्गो घालून कुठ्ठेही फिरताना आढळतात, पण म्या कोब्रा नैय बाॕबा थट्टा करत कुणाची!..कारण कुणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न! आणि त्यावरुन कुणीही छोटा किंवा मोठा ठरत नाही! (आणि ते शोभायलाही हवेत! ) उद्या मी मुंबईतल्या पोवार किंवा पुण्यातल्या मॕकड्रपकडून महाराजांचा किंवा शंभूराजांचा ड्रेस भाड्याने आणून घालून फिरलो म्हंजे मी मोठा होत नाही किंवा महाराजांची थोरवी छोटी ठरत नाही! नै का? (by the way - मी काही वर्षांपूर्वी सलग साडेतीन महिने दाढी वाढवून "रायगडाला जेव्हा...." मधे शंभूराजे साकारला होता..आणि बराच चांगल्या प्रकारे बरें! ;-) )
पण ब्राह्मणांना ते झेलावं लागतं. आमच्या जातीमध्ये सावरकर, आगरकर, कर्व्यांसारखे महान समाजसुधारक आणि अत्यंत माॕडर्न विचारांची माणसं असताना दुसरीकडे काही मूठभर लोकांनी ( होय, मूठभरच कारण आमची लोकसंख्याच मुळातच कायमच टोटल लोकसंख्येच्या इनमीन ३%!) इतर जातीतल्यांवर अन्याय केले कोणे एके काळी, म्हणून म्हणे आमची जात आणि आमची आजची पिढी पण वाईट?!! म्हणजे ब्राह्मणांच्या पूर्वजांपैकी मूठभरांनी दीडशे वर्षांपूर्वी छळलं म्हणून आजच्या ब्राह्मणांच्या पिढ्यांचा दुःस्वास करणारे, त्यांच्याच पूर्वजांना "ब्राह्मणांहून शंभरपटीने जास्त छळणा-या" ब्रिटिशांच्या/ आंग्लांच्या आजच्या पिढ्यांचा आणि "ब्राह्मणांहून त्यांना हजारपट जास्त छळणा-या" मोगलांच्या/ यवनांच्या/म्लेंच्छांच्या आजच्या पिढ्यांचा दुःस्वास करणं सोडाच, उलट त्यांच्या गळ्यात गळे घालून बसलेले दिसतात ही एक आयरनीच! 😡 ....(एका विशिष्ट दिवशी पेशव्यांच्या २८००० फौजेला हरवलं म्हणतात...च्यामारी मुळात ३% आसणारे ब्राह्मण २८००० संख्येने सैन्यात असायला मुळात तेव्हा महाराष्ट्रात ९ लाख ३३ हजार ३३३ लढाऊ सैनिक ब्राह्मण असायला हवे होते...ते १८१८ साली असणं अशक्य!!..मं नक्की कोण सैनिक होते ते पेशव्यांचे २८००० जे हरले??)..असो!
हे असं वर्षानुवर्षं सुरु होतं. एका नामांकित शाळेचे प्रिन्सिपल असणारे माझे वडिल, दुस-या शाळेत शिक्षिका असणारी माझी आई आणि त्यांची पिढी रिटायर होत गेल्यावर,आमच्या आसपासच्या शाळांमधलं वातावरण बदलत जाताना दिसलं. मग सरकारी आॕफिसेस आणि ब-याच ठिकाणांमधून एक सत्य उमगत गेलं की चक्क आपल्या राज्यघटनेमध्ये केल्या गेलेल्या बदलांमुळे म्हणा किंवा कसं पण "जातीभेदा"ला सरकारी अधिष्ठानच मिळत गेलंय आणि सरकारतर्फेच चालवल्या गेलेल्या बर्थ सर्टिफिकेटवरच्या त्या अन्याय्य जातीभेदामुळे मग गेल्या वीसेक वर्षांत मला कधी नव्हे ती माझी जात कोब्रा आहे आणि म्हणून आमचा दुःस्वास करतात हे कळत गेलं. (मला एक प्रश्न पडतो - "हे जे कोब्रांचा दुःस्वास करतात ते पुढच्या जन्मांत ब्राह्मणापोटी जन्माला आले तर?"..म्हंजे ह्यांच्याच पुढच्या अ-ब्राह्मण पिढ्या ह्यांच्याच पुढच्या ब्राह्मण-जन्मांत ह्यांचाच दुःस्वास करतील? छळतील? कारण पुढचा जन्म काही आपल्या हातात नसतो!)..मोठाच पोएटिक जस्टीस ठरेल तो मग!! नै का!! ;-)
पण तरीही मला पराकोटीचा अभिमान आहे की माझ्या चित्पावन कोब्रांमधला कुणीही- आगदी पोलीसांचं रेकाॕर्ड काढून पाहा- कुणीही - "राडे, दगडफेक, जाळपोळ, खुनाखूनी, भोसकाभोसकी, रक्तपात, कार्सबसेसना आगी लावणे, लाल सिग्नल न पाळणे, रस्त्यावर थुंकणे, बायकांची मंगळसूत्र खेचणे, घाणेरडा पादरा आवाज करणा-या बाईक्स जोसात नेणे, मोठ्ठाले फ्लेक्स लावून सिग्नलच झाकून टाकणे" आसल्या "देशद्रोही" कृत्यांत नसतो! कध्धीच नसतो!!
तर आता मूळ मुद्दा - ब्राह्मण आणि त्यातही कोब्रा कंजुष असतात वगैरे ऐकायला, वाचायला मिळत गेलंय आणि गंमतच वाटली, आम्ही कंजुष? (पुन्हा तीच अॕनॕलाॕजी लावायची तर लोकसंख्येच्या केवळ ३% संख्या आसणा-यांतल्या काही मूठभर कोब्रांनी तुम्ही घरी आल्यावर पंखे बंदच ठेवले असतील किंवा चहा विचारला नसेल म्हणून सरसकट सगळे कोब्रा कंजुष नाही ठरत! उलट मला आठवतंय..मी बिनदिक्कत सगळ्या खोल्यांमधले पंखे चालू ठेवून कुठेही बागडताना,उलट घरी आलेलेच कुणी मला आठवण करायचे "कशाला पंखे जाळतोयस?" म्हणून..आणि आता एनर्जी काँन्झर्व्हेशन आणि एन्व्हायर्न्मेंट फ्रेंडली युगात तर आवश्यकता नसताना असे पंख बंद ठेवणंच महत्त्वाचं! (मुंबईच्या लोकलमधेही शेवटचं स्टेशन येऊन गाडी बराच वेळउभी राहणार किंवा यार्डात जाणार म्हटल्यावर पंख्यांचं बटन बंद करुन वीज वाचवणारे कोब्राच असावेत?!!)
माझ्या दैवतांना, थोर विभूतींना नावं ठेवतात तेव्हा तर कसं रिअॕक्ट व्हावं कळतच नाही!
अथांग ब्रह्मांडात इतकी पॕरलल वर्ल्ड्स, हज्जारो आकाशगंगा, अब्जावधी तारे, कोट्यवधी ग्रह..त्यातला एक ठिपका पृथ्वी आणि त्या ठिपक्यावरच्या अब्जावधी सजीवांतले अतीसूक्ष्म आपण कुणीतरी! मग कशाचा इगो? त्यात आयुष्य जेमतेम ७०-८० वर्षाचं किंवा कमीच...मग कशाला आपसांतले विद्वेष आणि मारामा-या?..
पण काहीजणांना नसतं भान!..आणि उरलेल्यांना कळतही नाही आणि आकळत त्याहूनही नाही!!
मग उगाच कोब्रांना कंजुष ठरवून मोकळे. उलट आमच्याकडे खूप कमी पैसे असले तरी भरभरुन देतो आम्ही. बरं जे फुकट आहे..ज्याला पैसे पडत नाहीत ते "शब्द"सुद्धा आम्हाला नावं ठेवणारे कंजुषपणे वापरतात त्यांची तर कीवच येते!..उदाहरणार्थ - आम्ही How are you?", " Take care", "Good morning" लिहायचंच झालं तर पूर्ण अल्फाबेट्स वापरु. पण ही आम्हाला शिव्या घालणारी कोत्या मनाची मंडळी स्वतःच "अक्षरांची कंजुषी" करत -"Hw r u?", "Tc", "GM'. असं लिहितात..जणू ते अख्खं टाईप करण्यात चार सेकंद जास्त गेले तर यांचे चार कोटी कमवायचे राहणार असतात!! जेफ बेझाॕसच जणू हे सारे! नाॕनसेंन्स! मला असा भाषेचा अपमान किंवा तोडमोड नाही पचत!
तसंच ते कोब्रांच्या शुद्ध भाषेची थट्टा करणारे जेव्हा निर्जीव वस्तू सजीवांना "मिळाल्या"ऐवजी "भेटल्या" म्हणतात आणि वर आम्हाला शिव्या घालतात तीच मंडळी इंग्लीशमधे मात्र निर्जीव वस्तूंसंदर्भात ""I found the pen", "I got the mobile", "" I found the chair" म्हणतात "I met the pen/The pen met me", "I met the mobile/ The mobile met me", "I met the chair/ The chair met me" म्हणताना दिसत नाहीत..ही एक गंमतच!!
असो!..ती मंडळी जितकी म्या कोब्र्याला नावं ठेवतील तितका माझा (आधी कधी नसणारा) कोब्राभिमान वाढेल!!
तुम्ही कधी ट्रान्झॕक्शनल अॕनॕलिसिसवरचं "Born to win" वाचलंय? ..मग कळेल की ""Superiority complex" असणा-यांना deep within आपण inferior असल्याची भावना असते/ किंवा जाणीव असते. आणि ती ओव्हरकम करताना आपण सुपिरिअर आहोत असं जगाला भासवणं सुरु होतं...कळ्ळ्या?..तर असं काय काय....
असो! कोब्रा असून कंजुषी नाही करत शब्दांची म्हणून किंssचित मोठी झाल्ये हां का पोस्ट!! (नंतर जरा सविस्तर पोस्ट लिहिन आणखी!)
हे काही कोब्रांचे फोटोज झलक म्हणून प्रातिनिधिक!
तूर्तास टाटा!!
No comments:
Post a Comment