निनोच्का
-------
स्वीडनने जगाला दोन ग्रेट अभिनेत्री दिल्यात! एक अर्थातच पृथ्वीतलावरची माझी सर्वात लाडकी इंग्रीड बर्गमन आणि दुसरी तिला १० वर्षांनी सिनियर असणारी ग्रेटा गार्बो! काल रात्री १९३९ सालचा ग्रेटा गार्बोचा "निनोच्का" हा मज्जेशीर मूव्ही पाहिला!
तशी ग्रेटा आधी गाजली होती ती मूकपटांतनं (सायलेंट मूव्हीज)..आणि जेव्हा तिने पहिल्यांदा बोलपटात (टाॕकी) काम केलं तेव्हा त्या सिनेमाची टॕगलाईन होती "ग्रेटा टाॕक्स' ..आणि त्यालाच पॕरलल जाणारी "निनोच्का"ची टॕगलाईन होती "ग्रेटा लाफ्स!" ...कारण तिची एंट्री गंभीर...पुढचा बराच वेळ ती अचाट गंभीर आणि रुक्ष भाव चेहे-यावर ठेवून असते..पण जेव्हा ती खळाळून हसल्येय तेव्हा तिच्या त्या लोभस खळाळत्या हसण्याच्या प्रेमातच पडायला होतं!..
परवाच अर्न्स्ट लुबीशचा "हेवन कॕन वेट" पाहून इम्प्रेस झाल्यावर त्याचे जमतील तितके मूव्हीज बघायचं नक्की केलं आणि लगेचच काल रात्री "निनोच्का" बघितला!! (आणि स्वतःला शिव्याच घातल्या "इतकी वर्षं कसा काय हा धम्माल मूव्ही राहून गेला बघायचा?" म्हणून!! ;-) )
पॕरीसमधे घडणा-या या सिनेमात रशियन राजकारण, रशियन समाज आणि त्या कम्युनिस्टांच्या पोलादी दहशतीखालच्या वातावरणाला धमाल कोपरखळ्या दिल्यायत्....(या सिनेमावर रशियात बंदी घातली गेली होती)..
ग्रँण्ड डचेस स्वाना च्या (इना क्लेअर) रशियन राजवटीनं जप्त केलेल्या मौल्यवान दागिन्यांचा लिलाव करुन ती रक्कम रशियात घेऊन जाण्यासाठी तीन रशियन काॕम्रेड्स बुल्जॕनाॕफ, इरॕनाॕफ आणि कोपाल्स्की पॕरीसमधे आलेत...रशियातल्या बंधनकारक जीवनातनं पॕरिसच्या रगेल आणि रंगेल वातावरणात आल्यावर तिघंही तिथे असेपर्यंत जीवाचं पॕरीस करायचं ठरवून महागड्या हाॕटेलातल्या महागड्या स्वीटमधे उतरलेत. त्यांना डचेस स्वानाच्या वतीने दागिने परत मिळवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी करायला आलेला तिचा दोस्त काऊंट लिआॕन (मेल्व्हीन डग्लस) त्यांना बोलण्यात गुंगवतो आणि एकीकडे कोर्टकचेरीच्या भानगडीत अडकवून दुसरीकडे त्यांना हाॕटेलच्या मुक्कामातला "असली मझा".काय त्याची झलक देतो..तिघे पाघळतात आणि त्यांचं दागिने विकून पैसे वसूल करण्याचं काम लांबणीवर पडतं...रशियात ती खबर गेल्यावर तिथला वरिष्ठ अधिकारी ते काम धसाला लावण्यासाठी काॕम्रेड निनोच्का याकुशोवा ला (ग्रेटा गार्बो) पाठवतो.
शिडशिडीत काटकुळ्या बांध्याची ग्रेटा दिसते मात्र फारच सुंदर! तिच्या पॕरीसमधल्या आगमनानं आणि अत्यंत शिस्तप्रिय, करड्या आणि रुक्ष आविर्भावानं तिघांची गाळण उडते. निनोच्का हाॕटेलमधे दाखल झाल्याझाल्या पॕरीसच्या प्रसिद्ध वास्तूंचा अभ्यास करायला बाहेर पडते आणि योगायोगान तिची गाठ काऊंट लिआॕनशी पडते...
तो तिचा गाईड बनून तिच्याबरोबर आयफेल टाॕवरवर जातो आणि आपल्या काहीश्या फ्लर्टेशस अंदाजात तिच्यावर छाप पाडत तिला आपल्या फ्लॕटवर घेऊन जातो..
त्या दोघांचे प्रसंग आणि त्यावेळचे संवाद कमालीचे रंजक आणि मजेशीर! हा सीन फारच हळुवार रंगत जातो...
(घड्याळात रात्री बाराचे टोले पडतात)
Leon- Do you hear that?
Ninotchka- It's twelve o'clock.
Leon- It's midnight. Look at the clock. One hand has met the other hand. They kiss. Isn't that wonderful?
Ninotchka- That's the way a clock works. What's wonderful about it?
Leon- Ninotchka, it's midnight. One half of Paris is making love to the other half.
Ninotchka- You merely feel you must put yourself in a romantic mood to add to your exhilaration.
Leon- I can't possibly think of any better reason.
Ninotchka- That's false sentimentality.
Leon- Oh, you analyze everything out of existence. You'd analyze me out of existence but I won't let you. Love isn't so simple, Ninotchka. Ninotchka, why do doves bill and coo? Why do snails, the coldest of all creatures, circle interminably around each other? Why do moths fly hundreds of miles to find their mates? Why do flowers slowly open their petals? Oh, Ninotchka, Ninotchka, surely you feel some slight symptom of the divine passion? A general warmth in the palms of your hands, a strange heaviness in your limbs, a burning of the lips that isn't thirst but something a thousand times more tantalizing, more exulting, than thirst?
Ninotchka: You are very talkative.
(लिआॕन तिचं चुंबन घेतो)[
Leon- Was that talkative?
Ninotchka- No, that was restful. Again. (तो पुन्हा एकदा दीर्घ चुंबन घेतो).Thank you.
Leon- Oh, my barbaric Ninotchka. My impossible, unromantic, statistical
(तो असं म्हणेपर्यंत ती त्याला जवळ ओढते घट्ट मिठीत आणि चुंबन घेते...पुन्हा...पुन्हा...)..
पुढे दागिन्यांचा लिलाव होतो का? निनोच्काला हात हलवत रशियाला परत जावं लागतं? काऊंटची आणि तिची पुन्हा भेट होते का?....
No comments:
Post a Comment