Monday, 14 June 2021

बॕटींग...नव्हे बोलींग!!

पुन्हा एकदा..

"बॕटींग की बोलींग?"
-----------
खरं तर 'बॕटींग' ही प्रतिकारात्मक बाब असते नं? म्हंजे अंगावर आलेल्या बाॕलचा प्रतिहल्ला? आणि "बोलींग म्हणजे आक्रमण" किंवा "हल्लाबोल?!!"

'बॕटींग' तेव्हाच शक्य असते जेव्हा तुमच्या अंगावर समोरुन काहीतरी वेगाने येऊन कोसळतं?

आणि "बोलींग म्हणजेच ते कोसळणं" किंवा "आक्रमण किंवा जोरदार हल्ला?!!!!"

बरोबर??..

मग आपला यच्चयावत् सर्व मूर्ख मिडीया "पावसाची जोरदार बॕटींग" अशी बिनडोक शब्दरचना का करतात?..मुसळधार पाऊस म्हंजे अस्मानातून अंगावर "कोसळणारा कोट्यवधी लीटर पाण्याचा हल्ला" नं?..म्हंजे खरंतर पावसाची जोरदार "बोलींग" म्हणायला हवं?!! आपण जे छत्र्या आणि रेनकोट सावरत करतो ती आपली डिफेन्सिव्ह बॕटींग खरं तर!

यडपटचैय आपला मिडीया!🙄🤔😜🤣

No comments:

Post a Comment