Monday, 14 June 2021

मंकी बिझिनेस

"मंकी बिझीनेस"
-------------
वय वाढत गेलं तरी तरुणाईचा जोष कुणालाही हवाहवासाच वाटत असतो. मग माणसाला एका घोटात वय खरोखरीचं 'तरुण बनवणारं' जादुई पेय आलं बाजारात तर? काय धमाल उडेल नै?..तर तशीच धमाल सांगणारी ही सिंम्पल कथा -- १९५२ सालचा "मंकी बिझिनेस!"..

कॕरी ग्रँट हा विसरभोळा प्रोफेसर अशाच एका जादुई फाॕर्म्युल्यासाठी धडपडतोय. त्याच्या प्रयोगशाळेत आसणारं चिंम्पँन्झी त्याच्या हातातल्या वेगवेगळ्या द्रवांवर, बाटल्यांवर लक्ष ठेवून आहे..आणि एक दिवस प्रोफेसर नसताना ते चिंम्पँझी उपद्व्याप करुन ह्यातलं त्यात, त्यातलं ह्यात एकत्र करुन काहीतरी मिक्स्चर तयार करतं आणि लँबच्या पाणी प्यायच्या कूलरच्या टाकीत ते ओतून ठेवतं..पाण्याचा बुधला घेऊन येणारा माणूस, बुधला उलटा करुन त्या कूलरवर ठेवतो आणि मग पाण्यात ते सगळं मिक्स होऊन जातं! (आपण गेल्या वीसे-तीस वर्षांत जे बिसलेरीचे टाकीवर उलटे करुन ठेवायचे बुधले बघतोय ते तिथे १९५२ सालापासून आहेत म्हणजे! ;-) 

आणि मग एकेक जण ते पाणी प्यायल्यावर हास्यस्फोटक प्रसंगांची मालिकाच सुरु होते!

सगळे प्रसंग सांगत नाही, पण एकदा त्या जादुई पाण्याचे तीनचार ग्लास रिचवून प्रोफेसर (कॕरी ग्रँट) आणि त्याची बायको (जिंजर राॕजर्स) एकदमच टीन एजर्स बनतात त्यावेळची धमाल बघण्यासारखी!आपल्या शेजारी झोपलेलं नागडं मूल म्हणजे आपला औषध पिऊन पार बाळ झालेला नवरा समजून त्यावरुन पुढे रंगत गेलेला प्रसंग मजेशीर आणि लहान बनून, लहान मुलांच्यात रेड इंडियन बनून कॕरी ग्रँटचं बागडणं आणि बायकोच्या मित्राचं scalping करणंही धमालच! :-D 

यात मेरिलीन मन्रोचाही छोटा रोल आहे पण क्काय दिसते ती हाॕट् हाॕट्ट!! 😍

कॕरी ग्रँट, मन्रो आणि एकूणच जुन्या काळातले सिनेमे आवडणा-या माझ्यासारख्यांना हा त्या काळात नेणारा मूव्ही!

फाॕर्म्युल्याचा कागद नष्ट झाल्यावरचा शेवटचा सीन-

प्रोफेसरला बायको विचारते "what's the new formula?"

तो हसून उत्तरतो-"Well, it doesn't come in packages or bottles.You are old only when you forget you are young!!.. It is a word you keep in your heart...a light you have in your eyes...someone you hold in your arms..."

खरंच्च!!..किती खरंय नं ते?!!🥰😍

No comments:

Post a Comment