Thursday, 17 June 2021

डिझायर

डिझायर....!!
---------
काल रात्री जरा आणखीच मागे गेलो. 1936 सालात!! B&W जमान्यात! एका किंमती हाराच्या चोरीची कथा सांगणारा "डिझायर" पाहिला! तरणाबांड, उंचापुरा गॕरी कूपर आणि जर्मन अभिनेत्री मार्लिन डिट्रिच चा हा गाजलेला सिनेमा!

पॕरीसला 'ब्राॕन्सन 8' कंपनीत आॕटोमोबील इंजिनियर असणा-या गॕरी कूपरला त्याचा बाॕस, 15 दिवसांची सुट्टी घेऊन मजा करायला स्पेन ला जाऊ देतो एका अटीवर- त्याने कारच्या मागे कंपनीची जाहिरात लावायची - या दृश्यापासून सिनेमाला सुरुवात होते!

पुढच्याच दृश्यात मार्लीन डिट्रिच एका प्रख्यात ज्वेलरला पॕरीसमधल्या प्रख्यात नर्व्ह स्पेश्यॕलीस्ट डाॕक्टरची पत्नी असल्याची बतावणी करत "2 मिलियन 200 थाऊंजड फ्रँन्क्स"चा पर्ल नेकलेस पसंत करुन डाॕक्टरच्या आॕफिसमधे घेऊन यायला सांगते. आपला पती तिथे त्या रक्कमेचा चेक देईल हे सांगायला विसारत नाही. तो तिथे पोहोचायच्या आधी ती डाॕक्टरकडे पोहोचून, आपण त्या प्रख्यात ज्वेलरची पत्नी असल्याचं सांगत, आपल्या पतीला लोकांकडून पैसे मागण्याचा भ्रम होत असल्याने त्याने तपासण्याची विनंती करते. संध्याकाळी ज्वेलर तिथे आल्यावर नेकलेस ताब्यात घेऊन, तिथनं स्पेनच्या दिशेनं पोबारा करते. नंतर डाॕक्टर आणि ज्वेलरची अर्थातच जुंपते - हा सीन धमालच! ;-) 

स्पेनच्या सरहद्दीवरच्या चेकपोस्टवर सामानाची तपासणी होत असताना ती चलाखीनं तो मौल्यवान हार, गॕरी कूपरच्या कोटाच्या खिशात टाकते...आणि मग गॕरीकडून तो हार परत मिळवण्यासाठी तिचे पुढचे प्रयत्न सुरु होतात. दोघंही सॕन सबॕस्टीयनला पोहोचतात!

ती ज्या टोळीसाठी काम करत असते त्या साथीदाराबरोबर ती गॕरी कूपरच्याच हाॕटेलमध्ये उतरल्ये....मग ओघानंच गॕरीला जाळ्यात ओढणं आणि ते करत असताना स्वतःच त्याच्या प्रेमात पडणं...

हाराचं पुढे काय होतं...गॕरीची स्पेनची सुटी मजेत जाते का?...

जी मंडळी माझ्यासारखीच, त्या B&W जमान्यातल्या हाॕलीवुडच्या प्रेमात असतील आणि गॕरी कूपर, मार्लीन डिट्रीच वगैरे स्टार्सविषयी कुतूहल असेल त्यांनी जरुर बघावा!

No comments:

Post a Comment