Thursday, 17 June 2021

आ मॕटर आॕफ लाईफ अँन्ड डेथ

"A matter of Life and Death"
------------------------
What a movie!! What a movie!!!

कालच मैत्रिण गौरी मला समजावत होती की आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघ "जे होतं ते भल्यासाठी होतं" हे वाक्य शब्दशःअर्थ बघून न घेता...जे होतंय ते विधिलिखित समजून, predecided समजून accept करायला शिक!"--- आणि मला त्याचा प्रत्यय खूप वेगळ्या प्रकारे येतोय. Corona Pandemic भीषणच..पण त्यामुळे जो जबरदस्तीचा 'बंदिवास' आलाय नशिबी, त्यातनं ज्या आयुष्य ढवळून काढणा-या गोष्टी घडल्यात, त्यातून गवसलेल्या प्रचंड महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे मी पूर्वीसारख्याच जोमानं भरपूर वाचन करतोय आणि पूर्वीपेक्षाही धडाक्यात, मनःपूत जुने १९३०-६० या सुवर्णकाळातले सिनेमे बघतोय!...पहिल्या लाॕकडाऊनच्या २१ दिवसांतच मी जवळजवळ ३२ पुस्तकं वाचून त्यावर लिहिलं होतं..नंतर पुस्तक परिक्षण थांबवलं तरी अजूनही दिवसाआड वाचतोच आहे आणि गेले कित्येक आठवडे रोज, अक्षरशः रोज मध्यरात्री-  'किमान एक' जुना सिनेमा..त्या १९३०-६० मधल्या हाॕलीवूडच्या सुवर्णयुगातला सिनेमा बघतोय...आणि त्यानुषंगाने तुमच्याशी नियमित शेअरिंग होतंय! ;-) 

काल रात्री दोनला बघून संपवलेला १९४६ सालचा, "A matter of Life and Death" हा असाच विलक्षण सिनेमा! डेव्हिड निवेन ह्या ब्बाप ब्रिटिश कलाकाराचा! डेव्हिड निवेनचे त्याआधी "हॕपी गो लव्हली", "बेडटाईम स्टोरी", "कसिनो राॕयल", "गन्स आॕफ नॕव्हराॕन", "सी वूल्व्हज" असे चारपाचच सिनेमे पाहिले होते. पण हा सिनेमा आगळाच!

माणूस मरतो पण त्याचं प्रेम त्याला जिवंत ठेवतं...मृत्यूनंतरही प्रेम करुन बोनस लाईफ मिळवलेल्या फायटर पायलटची अद्भूत चित्तचक्षुचमत्कारिक कथा!..यात पृथ्वीवरच्या देहावर स्वर्गात चालणारा खटला आहे त्याचा हुकलेला मृत्यू त्याला मिळून यमदूताची (कंडक्टर-७१) चूक सुधारण्यासाठी!

सिनेमाची सुरुवात अंतराळातल्या दृश्यांपासून...वेगवेगळ्या आकाशगंगा..तारे...मग आपली सूर्यमाला...पृथ्वी आणि ढगातून वेगाने निघालेलं जळतं विमान...दुसरं महायुद्ध संपत आल्याचा काळ! एक्झॕक्ट सांगायचं तर २ मे १९४५ला जर्मनीत कामगिरी उरकून इंग्लंडला परतणा-या विमानावर झालेल्या तोफेच्या मा-यात इंजिनने पेट घेतलाय...को-पायलट मेलाय...आतले जवान पॕराशूटच्या सहाय्याने केव्हाच उड्या मारुन गेलेत... काहीच वेळात विमान कोसळून विमान चालवणारा स्क्वाॕड्रन लीडर पीटर कार्टरही मरणारच आहे...तेव्हढ्यात त्याचा संपर्क दोस्त राष्ट्रांतर्फे उभारलेल्या रेडिओ स्टेशनमधल्या अमेरिकन आॕपरेटर ज्यूनशी ( किम हंटर) होतो...त्याला ज्यूनचा आवाज फारच आवडलाय..तो तिला तसं सांगतोही...तिने आपल्या आईला बहिणीला मेसेज द्यावा की "मी भेटू शकणार नाही..पण माझं खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर....".."आणि ज्यून, मला तुलाही भेटायला आवडलं असतं...आता माझा देह जेव्हा मिळेल तेव्हा मात्र मला पाहू नकोस..मान फिरव.."...वगैरे...मरणाच्या दारातल्या निडर पीटरचं बोलणं ज्यूनला भावतं..त्याने वाचलं पाहिजे ही तिची मनापासून इच्छा...ती पीटरला सांगते त्या पेटत्या विमानातून उडी घ्यायला..पण पीटर तिला सांगतो Yes, तोही विमानात भाजून मरण्यापेक्षा उडी घेतोय फक्त एक छोटीशी अडचण की विमानातलं पॕराशूट जळून गेलंय त्यामुळे तो पॕराशूटविनाच उडी घेतोय म्हणून!..त्यांचं संभाषण ऐकण्यासारखंच!.

इंग्लंडच्या त्या किनारपट्टीवर असलेल्या दाट धुक्याच्या आवरणामुळे त्याला न्यायला आलेला फ्रेंच यमदूत 'कंडक्टर ७१' त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. एवढ्या उंचावरुन पॕराशूटविना पडलेला पीटर चक्क वाचतो!..त्याची आणि ज्यूनची भेट होते...प्रेम उमलतं...

दरम्यान तो फ्रेंच यमदूत २० तास उशीरा पीटरचे प्राण न्यायला तिथे येतो. पीटर त्याला सांगतो की या चुकामूकीत त्याचा काहीच दोष नसल्याने त्याला स्वर्गस्थ न्यायव्यवस्थेत त्याची बाजू मांडण्याची संधी मिळावी..त्यावेळचे डायलाॕग्ज भारीच! ;-)  पीटरला तशी संधी मिळतेही...

यानंतर सिनेमा प्रचंड उत्कंठावर्धक बनतो...पीटरला तो यमदूत येऊन वारंवार भेटणं हे सगळं ज्यूनला त्याला होणारे भास वाटतात..आणि ती गावातल्या डाॕक्टरची मदत घेते...

स्वर्गात न्यायनिवाडा होण्याचं ठरतं..तेव्हा पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाणारा एक महाप्रचंड एस्केलेटर आणि त्य पाय-यांवरुन सरकत जाणारे पीटर आणि यमदूत...१९४६ सालच्या टेक्निकच्या मानानं अफाटच ती दृश्यं!..पीटरवर आॕपरेशन होणार त्यादिवशी गावात वादळी पाऊस..आणि बाईकवरुन निघालेल्या डाॕक्टरचा अपघाती मृत्यू...आणि मग पुढे तो डाॕक्टरच स्वर्गामधे पीटर आणि ज्यूनच्या प्रेमाची केस लढवतो...पण केवळ प्रेमात पडलाय म्हणून त्याला का जगू द्यावं यावर अर्ग्युमेंट होतं...चिक्कार वाद-प्रतिवाद होतात...

पीटरला विचारलं जातं-

"You claim you love her. Can you prove it?"
"Well, give me time Sir! 50 years will do!"
"But can you prove it?"
""Can a starving man prove he is hungry, except by eating?"
"Would you die for her?"
"I would!!...but...er...I would rather live!"

हा सर्व प्रसंग जबरदस्तच!!!!...पुन्हा वाद-प्रतिवाद....पुढे सर वाॕल्टर स्काॕटच्या प्रेमाचं वर्णन करणारं अफलातून काव्य-

In peace, Love tunes the shepherd’s reed;
In war, he mounts the warrior’s steed;
In halls, in gay attire is seen;
In hamlets, dances on the green.
Love rules the court, the camp, the grove,
And men below and saints above;
For love is heaven, and heaven is love.!

सिनेमात पुढे काय होतं सांगायलाच हवं?😍

जरुर...जरुर पाहा...

No comments:

Post a Comment