"ब्रिंन्गिंग अप बेबी!"
----------------
या लाॕकडाऊनमधले गेले काही आठवडे माझ्या लाडक्या - "हाॕलीवूड मूव्हीजच्या सुवर्णकाळातल्या (१९३० ते १९६०) मूव्हीज"चा रतीब चालू आहे! नेम धरुन जाॕर्ज क्यूकर, हाॕवर्ड हाॕक्स, स्टॕन्ले डाॕननसरख्या दिग्दर्शकांचे आलटून पालटून रोज रात्री "किमान एक" मूव्ही बघतोच्च बघतो!!! त्यातही माझ्या पिंडाला मानवणारे राॕमकाॕम (रोमँन्टिक-काॕमेडीज) जास्त! ;-)
परवा रात्री कॕरी ग्रँन्ट- कॕथरिन हेपबर्नचा "द फिलाडेल्फिया स्टोरी" पाहिला होता..काल रात्री पुन्हा याच जोडीचा "ब्रिंगिंन्ग अप बेबी" हा १९३८ सालचा तुफ्फानी धुमाकूळ मूव्ही पाहिला!! अशक्य धम्माल! सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक फ्रेमला सतत हास्य फुलवणारी ही मॕड मॕड झेनी काॕमेडी! कॕरी ग्रँन्ट आणि कॕथरिन हेपबर्न तर कहर सुटलेत यात नुसते! 😄..दिग्दर्शक हाॕवर्ड हाॕक्सला मानला पाहिजे! विनोदी प्रसंग दिग्दर्शित कसे करावेत याचा अत्युत्कृष्ट नमुना म्हणजे हा सिनेमा!..
आपल्याला वेगवेगळ्या ट्रेट्स साठी वेगवेगळी माणसं आवडून जतात, बरोबर? म्हणजे कुणाचं दिसणं, कुणाचा बोलणं, कुणाचं वागणं, कुणाचे डोळे, कुणाचा आवाज, कुणाची गालावरची खळी...तसं एरवी साधारण दिसणारी, सुंदरबिंदर नसणारी, पण अवाक् करणा-या सहजतेनं कुठलीही भूमिका लीलया साकारणारी कॕथरिन हेपबर्न मला आवडून गेली ती तिच्या 'खळाळत्या हसण्या'साठी! या सिनेमात किमान दोन प्रसंगात कॕरी ग्रँन्टचा पोपट झाल्यावर ती जी काही खळखळून हसल्ये की तत्क्षणी त्या हसण्याच्याच प्रेमात पडलो मी! 😍
हा सिनेमा फिरतो "बेबी" भोवती! आणि 'बेबी'च्या अनुषंगाने 'जाॕर्ज' भोवती! यातला बेबी आहे चक्क एक बिबळ्या! आणि 'जाॕर्ज' आहे एक कुत्रा!!
साधा भोळा पॕलीओन्टाॕलाॕजिस्ट डेव्हिड हक्स्लेला (कॕरी ग्रँन्ट) त्याच्या म्युझियमसाठी मिसेस रँन्डमकडून एक मिलियन डाॕलर डोनेशन मिळण्याची शक्यता निर्माण झाल्ये आणि तश्यातच त्याच्या हिस्टरी म्युझियममधल्या ब्राँन्टाॕसाॕरसचा सांगाडा पूर्ण होण्यासाठी ज्याची कमी होती, त्या साखळीतलं एक हाड नुकतंच एका ठिकाणी मिळालंय आणि ते कुरीयरने त्याच्यापर्यंत पोहोचतंय अश्या दोन गुड न्यूज तर आहेत शिवाय दुस-याच दिवशी आपल्या म्युझियमच्या असिस्टंटबरोबर तो लग्न करणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तो मिसेस रँन्डमच्या वकीलाबरोबर, मिस्टर पीबाॕडीबरोबर बोलणी करण्यासाठी त्यांच्याबरोबर गाॕल्फ खेळायला आलाय. तिथे त्याची गाठ सुझनशी (कॕथरिन हेपबर्न) पडते जी त्या मिसेस रँन्डमची वारसदार आहे! डेव्हिड-सुझनच्या त्या पहिल्या भेटीपास्नंच त्याच्या आयुष्यात गडबड, गोंधळाला जी काही सुरुवात होते तीच धुमाकूळ! :-D ..त्याचं पूर्णपणे मनाविरुद्धच तिच्याबरोबर बेबीला (पाळीव बिबट्या) घेऊन कारने त्या मिसेस रँन्डमच्या इस्टेटीवर जाणं...तिथे बेबीने सुटून पळापळ करणं...डेव्हिडला कुरीयरने मिळालेलं ते प्राचीन हाड तिथल्या (वस्तू पळवून खड्डा खणून पुरुन ठेवण्याची आवड असणा-या-) जाॕर्ज कुत्र्याने पळवणं...त्याच भागातल्या सर्कसमधला बेबीसारखाच दिसणारा दुसरा बिबळ्या सुटून त्याच इस्टेटीवर येणं...सुझनने कपडे लाँन्ड्रीत टाकले म्हणून तिथेच मिळालेला लेडीज गाउन घालून बसलेल्या डेव्हिडसमोर अचानक आँट एलीझाबेथ रँन्डम येणं...सुझनने अचानक तिथे आलेल्या आँन्ट एलीझाबेथला डेव्हिड हक्स्लेची ओळख 'शिकारी मिस्टर बोन' म्हणून करुन देणं..तिथे नेमका मिसेस एलीझाबेथचा दोस्त खराखुरा शिकारी मेजर अॕपलगेट येणं आणि त्याने जेवताना गप्पांच्या ओघात बिबळ्याचा "मेटींग" काॕलचा आवाज काढल्यावर बेबीने त्या रोखाने येणं...आणि मग ते हाड शोधण्यासाठी जाॕर्जचा पाठलाग.. बेबीला शोधण्यासाठी आणि सुरक्षित कोंडण्यासाठी डेव्हिड आणि सुझनची धावपळ...त्यात सर्कशीतल्या न माणसाळलेल्या बिबळ्याची भर...रात्री बेबीला बोलावण्याच्या नादात सुझन-डेव्हिडने चालवलेल्या आरडाओरड्यामुळे जवळच्या बंगल्यातल्या माणसाच्या तक्रारीवरुन पोलीसांनी दोघांना पकडून पोलीस स्टेशनच्या लाॕकअपमधे टाकणं...त्यांना सोडवायला आलेल्या आँन्टलाही गैरसमजावरुन लाॕकअपमधे टाकणं...सुझनने तिथनं सटकून बेबीला गळ्यात दोरी टाकून पकडून तिथेच आणणं पण तो बेबी नसून सर्कशीतनं पळालेला बिबळ्या निघणं..खरा बेबीही तिथे येणं 🤣
ओह्ह...या सगळ्या धावपळीत..धामधुमीत एक्काहून एक हास्यस्फोटक प्रसंग घडत आपण खुदूखुदू आणि दोनतीनदा खोखो हसत लोटपोट होणं.....अशक्य धम्माल आहे हा मूव्ही!! 😆
कॕरी ग्रँन्टचा डेव्हीड, कॕथरिन हेपबर्नची सुझन आणि काॕन्स्टेबल स्लोकमच्या भूमिकेतला वाॕल्टर कॕटलेट आपल्याला हसवून मारतात...😆😄😂🤣🤣
No comments:
Post a Comment