Friday, 18 June 2021

शर्मिलाचा बर्थ डे

८ डिसेंबर : शर्मिला  
-------------------
"तुझी सर्वात आवडी नटी कोण" या प्रश्नाचं उत्तर सहसा "नूतन, मधुबाला, वहिदा" किंवा अलीकडच्या काळात "रेखा(???😳)" पलीकडे जनरली जात नाही. शर्मिला हे नाव कुणी आसुसून, आवर्जून घेत नाहीत, पण तरीही तिचे बहुतेक सर्व सिनेमे आपण सगळ्यांनी पाहिलेले असतात आणि आवडलेलेही असतात! तिचा प्रेझेन्स भावलेला असतो. तिच्या खळ्यांनी खल्लास केलेलं असतं! खरं तर आद्य खळीचा मान दुर्गाबाईंचा! पण त्यांना आपण पाहिलंय आईच्या, आज्जीच्या भूमिकेत! म्हणून खळीसाठी शर्मिलाच लक्षात राहत गेलेली!! 

आई आणि वडील दोघांच्या घराण्यांतून रबिन्द्रनाथ टागोरांशी नातं असणारी शर्मिला सर्वात आधी चमकली ती सत्यजित रे सारख्या ग्रेट दिग्दर्शकाच्या 'अपूर संसार'मधून आणि नंतर हिंदीत तिला मोठा ब्रेक मिळाला शक्ती सामंतांच्या KKK (कश्मीर की कली') मधून! 

राजेश खन्ना बरोबर तिचे अनेक सिनेमे हिट्ट झालेले असले तरी शम्मी आणि शशीबरोबरची तिची जोडीही मस्तच होती! शशी आणि तिच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. इन फॕक्ट "कश्मीर की कली"चं शूटींग चालू आसतानाचा गाजलेला किस्सा. शशी अचानकच काही कामानिमित्त शम्मी कपूरला भेटायला सेटवर आला. शर्मिला तेव्हा शशीच्या स्मॕशिंग गुड लूक्सबद्दल ऐकून होती. पण प्रत्यक्षात समोर आल्यावर त्याला तिने पाहिलं मात्र....ती पाहातच राहिली..."My god!!! कित्ती सुंदर आहे हा...!!"...तिची स्थिती विचित्र झाली...तिला पुढे शाॕटच देता येईना..शेवटी शक्ती सामंता यांनी शशीला सेटवरुन जायला सांगितलः तेव्हा कुठे शर्मिला पुढे सीन करु शकली...आणि मग पुढच्याच काळात तिची शशीबरोबर वक्त, सुहाना सफर, आमनेसामने, माय लव्ह मधून गोड जोडी जमली!

मन्सूर अली खान बरोबरची तिची courtship शशीच्या साक्षीनेच बहरली! आणि दोघांचीही घरं त्यावेळी नेपियन सी रोड परिसरात जवळजवळ असल्याने अनेकदा शशी-जेनिफर आणि शर्मिला-पतौडी हे संध्याकाळी एकत्र असायचे!  त्यावेळी ती उर्दू शब्द शिकायचा प्रयत्न करत होती. तिने शशीचा निरोप घेताना "खुदा "हाफीज" म्हटल्यावर शशी गंमतीत तिला चिडलत म्हणाला," येस येस "हाफ इज" हिज ..हाफ इज माईन!" ;-) 

दोघांची मुलंही एकमेकांना ओळखणारी! लहानग्या सैफ अली खानला तर शशी अंकल प्रचंड प्रिय! (कोणाला नसणार?) तर सैफ अली खानचा लहानपणीचा किस्सा - आपल्या आई आणि शशी अंकलच्या एका सिनेमाच्या सेटवर तो शूटिंग बघायला गेला होता. सेटवर नेमकं एक फायटिंगचं दृश्य शूट होत होतं. तो व्हिलन शशी अंकलला मारतोय हे खरंच वाटून छोटा सैफ कल्पना नसताना अचानक पुढे धावला आणि त्याने त्या व्हिलनच्या पायाचा करकचून चावाच घेतलान!!!..सेटवर एकच धमाल मग.....! "माय लव्ह" सिनेमाचा खूपसं शूटिंग नैरोबीमधलं! तिथे शर्मिला आजारी आणि तिला सडकून तापही भरला होता पण शशीने सांभाळून घेतलं आणि शूटिंग व्यवथित पार पडलं होतं! आजकाल झी-मराठीवर लोकप्रिय झालेल्या "तुपारे" मालिकेत वारंवार वाजवलं जाणारं "तेरा मुझसे हैं पेहले का नाता कोई" हे गाणं मुळात याच गोड जोडीचं! शशीला अभिनयाचं पहिलं नॅशनल अवॉर्ड मिळालं ते शर्मिलाबरोबरच्या "न्यू देल्ही टाइम्स" बद्दल!! 

अनुपमा, देवर, सत्यकाम..पासून ते पुढे आराधना, अमर प्रेम,दाग, आविष्कार, मौसम, गृहप्रवेश असे सगळेच बेफाट सिनेमे तिचे! १९६७ या एकाच वर्षी तिने शम्मीबरोबर 'ऍन इव्हिंग इन पॅरिस' आणि शशी बरोबर 'आमने सामने' मध्ये बिकिनीत दर्शन देऊन खळबळ उडवली होती!   

तसं पाह्यलं तर 

No comments:

Post a Comment