Friday, 18 June 2021

कामिनी कदम

कामिनी कदम 

जसं मी नेहेमी म्हणत असतो ना की माझं आणि इंग्रीड बर्गमनचं काही विलक्षण नातं असलं पाहिजे कुठल्या नं कुठल्या जन्मात इsssतकी आवडते ती मला! आणि तशीच काहीशी ही एक मराठी अभिनेत्रीसुद्धा प्रचंड आवडीची माझ्या!..का माहित नाही पण हिचंही कार्मिक नातं असावं असं वाटतं मला...नाहीतर ही का लहानपणापास्नं आवडून जावी मला?

बहुतेकजणांनी तिचा एक्कही सिनेमा पाहिला नसेल! आणि मेजाॕरीटी मंडळींच्या तर भृकुट्या वर जातील “क्कोण ब्बोवा ही कामिनी कदम?” म्हणून...

पण कां कुणास ठाऊक पण लहानपणी तिचा राजा गोसावी बरोबरचा सिनेमा “आंधळा मागतो एक डोळा” पाहताना कुण्या अतार्किक आणि  इनएक्स्प्लीकेबल कारणामुळे ही एकदम मनात जाऊन बसली!...

मग पुढे राजेंद्रकुमार बरोबरचा एक सिनेमा पाहिल्याचं स्मरतं..तिचा उभट पण गोड चेहेरा, ते कुरळेसर केस...त्याकाळी केस मागे रुमालाने बांधायची स्टाईल ...ते लोभस हसू...अगदीच कोरलं गेलं मनावर!...मला नं काही माणसांचे काही ट्रेट्स आवडले की प्रेमातच पडायला होतं त्या व्यक्तीच्या! तद्वत माणिक उर्फ कामिनी कदमचंच्या बाबतीत झालं!..B&W दूरदर्शनच्या माझ्या त्या किशोरवयात मी कसा प्रेमात पडलो असेन हिच्या कोण जाणे..नक्कीच मी मानतो तसं काहीतरी कार्मिक कनेक्शन असावं...नाहीतर इंग्रीड आणि नूतन पाठोपाठ मला हिचं कां एव्हढं प्रेम?..असो!

मुळची ही माणिक कदम (मुदलीयार?) आधी "स्मिता" नावाने काही सिनेमे करून मग "कामिनी कदम" या नावाने सिनेमे करायला लागली!..तिचे संतान, स्कूलमास्टर, तलाक, मिया बिबी राजी..वगैरे हिंदी सिनेमे गाजले होते!..

लहानपणी मराठी सिनेमे थेटरात जाऊन बघायचा संबंधच नव्हता..त्यामुळे हिचं दर्शन B&W दूरदर्शनमुळेच झालं होतं...

तर आज काही रेफरन्स चाळताना हिची आठवण निघाली होती...


No comments:

Post a Comment