मेमरी, मेमरी स्टोरेज आणि इरेझींग मेमरी"
-----------------------
जुनी गोष्ट! मेधाच्या घरी "Eternal Sunshine of the spotless mind" बघताना त्या सिनेमाच्या थीमवर बोलताबोलता "मेमरी, मेमरी स्टोरेज आणि इरेझींग मेमरी"वरुन भन्नाटच विषयाकडे गाडी वळली होती..
जिम कॕरे आणि केट विन्स्लेटचा हा सिनेमा म्हटलं तर रोमँन्टिक काॕमेडी पण त्याला चार्ली काॕफमन ह्या डोकेबाज पटकथाकाराने भन्नाट सायंटिफिक फोडणी दिल्ये!! जोअल बॕरीश (जिम कॕरे) आणि क्लेमेंटाईन (केट विन्स्लेट) हे रिलेशनशिपमधे येतायेता त्यांच्यात खटके उडतात..एकमेकांच्या काही सवयी खटकायला लागून बेबनाव!..आणि त्याची परिणती म्हणून क्लेमेंटाईन, डाॕक्टर मिर्झ्वाईककडे जाते आणि त्याने शोधलेल्या मशिनच्या सहाय्याने जोअलशी निगडीत सर्व मेमरीज इरेझ करुन घेते. (पुसून टाकते!) 🙄
ते कळल्यावर वैतागलेला जोअलसुद्धा तिच्यासंदर्भातल्या सर्व मेमरीज इरेझ करुन घ्यायला त्याच डाॕक्टरकडे येतो. डाॕक्टरचे असिस्टंट्स त्याने शोधलेल्या यंत्राच्या सहाय्याने त्याच्या मेंदूतून क्लेमेंटाईनच्या सर्व आठवणी/मेमरीज पुसून टाकत असताना एक गडबड होते आणि मग जी धमाल उडते त्यासाठी हा सिनेमा अवश्य बघाच!..
जिम कॕरे आणि विशेषतः केट विन्स्लेटने बहारदार अभिनयाने धमाल उडवून दिल्ये...
जोअल बॕरीश एका क्षणी आपली मनःस्थिती या शब्दांत बोलून जातो - "Why do i fall in love with every woman I see that shows me the least bit of attention?"..(हे जरा भिडलंच कारण आमचा समानधर्म च्यामारी.. ;-)😍🤣 )...
पण सिनेमा बघताना मधेमधे पाॕझ करत आमच्या गप्पा रंगल्या होत्या त्या "मेमरी आणि मेमरी स्टोरेज" या बेसिक गोष्टींवर...
मुळात माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले ते म्हणजे मेमरी/स्मृतींची जी साठवणूक असते ती नक्की कुठे?? आपल्याच मेंदूत?..की "काॕस्मिक काॕन्शसनेस"मधे? आजकालच्या जगात जसं "क्लाउड स्टोरेज" प्रकार असतो तसं यच्चयावत सर्व विश्वातल्या सजीवांची मेमरी (तीही जन्मजन्मांतरीची!) ही "विश्वचैतन्यात"च कुठे स्टोअर केलेली असते का?..आणि आपला मेंदू आपापल्या त्या खात्यातून/ साठवणुकीतून आपल्याला त्यात आपलंच स्टोअर केलेलं आपल्यापर्यंत पोहोचवतो का?...
तसं असेल तरवेगवेगळ्या आकाशगंगामधे, जीवसृष्टी असणा-या ग्रहांवरच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म जीवापासून ते महाकाय सजीवांपर्यंतची इतक्या सा-या पॕरलल युनिव्हर्समधली, इतक्या अनगिनत सजीवांची मेमरी या ब्रह्मांडात कुठे स्टोअर केली गेली असेल?..आणि ज्याच्या त्याच्या संचितामधून ज्याला त्याला ती यथावकाश रिट्रीव्ह करता येत असेल का?..
यातूनच मग एक असा विचार आला डोक्यात की- आपण आपल्याच ओळखीच्यांत/ नात्यात अशी काही मुलंमुली पाहतो की त्यांच्या आईवडिलांच्या घराण्यात आधीच्या अनेक पिढ्यांत एखादा वादनाचा, कलेचा ज्ञात वारसा नसूनही, त्या मुलाला/मुलीला उपजतच संगीताचं/चित्रकलेचं/वादनाचं अशक्य, अफाट आणि भन्नाट आविष्कार कसा आणि कुठून जमतो?..फाॕर्मल ट्रेनिंग न घेता अनेक वाद्य वाजवता येणं कसं जमतं?..मग असं तर नसेल की अनेक जन्मांतलं त्याच्या 'मेमरीचं जे संचित' विश्वचैतन्यात / या ब्रह्मांडातल्या एनर्जीत जिथे कुठे स्टोअर केलेलं आहे, तिथूनच त्याचा मेंदू ते रिट्रीव्ह करु शकतो? आणि म्हणून त्याला तो अचंबित करणारा आविष्कार जमतो?..
आणखी एक की - काही जणांच्या बाबतीत भूतकाळ इरेझ न होता (पुसला न जाता-) उलट वर्तमान आणि भविष्याची जाणीव होण्याची क्षमताच इरेझ होते का??..आपण नैका स्टाॕपच्या बाजूला/स्टेशनवर/रस्त्याच्या कडेला काही वेडे स्वतःशीच पण कोणाला उद्देशून काही बडबडताना बघतो/गप्पा मारताना दिसतात??.असं असेल का की ते त्यांच्या भूतकाळातला वर्तमानच ह्या चालू वर्तमानात जगत आसतात??..काय की...!!
पण हा जिम कॕरे-केट विन्स्लेटचा सिनेमा बरेच प्रश्न उठवून गेला मनात!..ज्या प्रेमी जोड्यांमधे असा बेबनाव होतो..ब्रेकअप होतं..त्यांना असं एकमेकांच्या आठवणी पार पुसून टाकून जगता येतं?..खरंच?..(आपल्याला अशा दुःखद, प्रेमभंगाच्या स्मृती आणि ती माणसंच अशी मेमरी इरेझिंग मशिननं पुसुनच टाकता आली मेंदूतून तर किती बरं होईल नं?) 🤔😧
No comments:
Post a Comment