Thursday, 17 June 2021

शराड्

शˈराड् 
-------
काल रात्री माझ्या आवडत्या काळातला- 1960s मधला "शˈराड्" बघितला! प्रत्येकाने बघ्घाच्च हा!! अज्जिबात मिस्स्स करु नका! "सिंगिंन्ग इन द रेन"वाल्या दिग्दर्शक स्टॕन्ले डाॕननचा हा धमाल रहस्यमय मूव्ही! यात ड्रामा आहे, रोमँन्स आहे, उत्कंठावर्धक स्टोरी आहे, थरार आहे..मुख्य म्हणजे कॕरी ग्रँन्ट आहे, आॕड्री हेपबर्न आहे!!..कॕरी ग्रँन्ट आपल्याला आवडतो बुवा! त्याचे बरेच मूव्हीज पाहिलेत! आणि आॕड्रीबद्दल बोलायचं तर लुकड्यासुकड्या नट्या आवडत नाहीत एरवी पण आॕड्री हेपबर्नचे बोलके डोळे, लोभस चेहरा यामुळे तिचे सिनेमेही बघतोच मी!.

आपल्या नव-याच्या खोटेपणाचा राग आलेली रेजी मैत्रिणीबरोबर सुटी घालवून नव-याला डिव्होर्स द्यायचा ठरवून पॕरीसला घरी परतते तर तिला लागोपाठ धक्के बसतात. एक म्हणजे आधी त्यांचं घर कुणीतरी पुरतं लुटलेलं असतं. एक्कही वस्तू शिल्लक ठेवलेली नसते. आणि ती सगळी विकाविकी नव-याने केलेली असते..आणि दुसरा धक्का म्हणजे त्याची हत्याही झालेली असते. त्याच्या फ्युनरलला तीन संशयास्पद माणसं येतात..आणि पुढे एक वेगळा ड्रामा चालू होतो -- त्या तिघांच्या म्हणण्यानुसार तिच्या नव-याने एका मोठ्या रक्कमेवर दोन लाख पन्नास हजार डाॕलर्सवर (1963 सालचे!) डल्ला मारलेला असतो...आणि आता त्यांना तिच्याकडून ते प्रचंड घबाड हवं असतं..पण तिच्याकडे कुठंय ते मुळात?

आणि मग सुरु होतो एक जबरदस्त रोमांचक थरार...ज्यामधे त्या प्रचंड रक्कमेच्या मागे त्या तिघांखेरीज एक चौथाही देखणा अमेरिकन असतो पीटर जोशुआ उर्फ अलेक्झांडर डाईल उर्फ अॕडम कॕनफिल्ड उर्फ ब्रायन क्रुकशँन्क!..हा खरा कोण असतो? त्या तिघांच्याच टोळीतला चौथा की...???

"शˈराड्"ची सगळी कथा फोडत नाही पण शेवटच्या क्षणापर्यंत थरार कायम असणारा हा मूव्ही!...शेवटचा भव्य  नाट्यगृहाच्या रंगमंचावरचा क्लायमॕक्स तर खासच!!

यात कॕरी ग्रँन्ट आणि आॕड्री हेपबर्नच्या तोंडचे संवाद चुरचुरीत आणि धमाल आणणारेच आहेत!

एकापाठोपाठ एक मुडदे पडायला सुरुवात झाल्यावर जेव्हा ती त्याच्यावर संशय,घेते तेव्हा तो तिला म्हणतो,"काय केलं की तुझा माझ्यावरचा संशय दूर होईल? पुढचा मुडदा मी बनू?" ;-) 

किंवा ती जेव्हा विचारते,"तुला फ्रेंच समजतं?" त्यावर तो-"एक शब्दही नाही! इथे तर मी इंग्लीश बोलताना धडपडतोय!"

आणि सर्वात गोड-- जेव्हा आॕड्री आपला चेहे-यावरचे भाव बदलत म्हणते-"ओह्स, आतामात्र माझा नर्व्हस ब्रेकडाऊन होतोय.." 

मजा आणल्येय दोघांनी! फारच अप्रतिम मूव्ही!!

ह्या सिनेमाचं वर्णन "हिचकाॕकचा बेस्ट सिनेमा- जो हिचकाॕकने कधीच बनवला नाही!" - असं केलं जातं यातच आलं सगळं की हा किती कमाल सिनेमा बनलाय ते!

No comments:

Post a Comment