#Film_Related_प्रसन्न
नेव्हर से डाय..!!
----------------
केवळ धमाल...हास्यस्फोटक सिच्युएशनल मॕड मॕड काॕमेडी!
'जाॕन किडली' हा बापाच्या पश्चात 20 मिलियन डाॕलर्सचा मालक. पण सदानकदा आपल्याला कसला न कसला आजार असल्याच्या संशयाने ग्रस्त माणूस. त्याचा इमानी नोकर जीप्पर'. जाॕनला लग्नासाठी भुणभुण लावणारी डाॕमिनेटींग 'जुनो'. तिला चकवून जाॕन जीपरबरोबर स्वित्झर्लंडममध्ये एका स्पा रिसाॕर्टमध्ये आराम करण्यासाठी आलाय.
जाॕनचा ताजा मेडिकल टेस्टचा रिपोर्ट येतो तो भलताच शाॕकींग! प्रचंड अॕसिडीटीचा कडेलोट झाल्यामुळे जाॕन केवळ महिनाभरच जगू शकेल हे त्या रिपोर्टमधून उघड होतं (जो मुळात अदलाबदल होऊन आलेला असतो आणि एका कुत्र्याचा रिपोर्ट असतो! ;-) )
'मिकी हाॕकीन्स' खरं तर श्रीमंत बापाची मुलगी, पण तिचं प्रेम 'हेन्री' नामक बस ड्रायव्हरवर. बापाने एका 'प्रिन्स'शी लग्न ठरवल्यामुळे ती घरातनं पळते आणि एका तलावात उडी घेते. बाजूलाच आराम करण्यासाठी आलेला जाॕन ते पाहून तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतो..पण मग लक्षात येतं त्याला पोहताच येत नसतं! मग मिकीच त्याला वाचवून काठावर आणते 😆
तिची कहाणी ऐकून सहृदयी जाॕन तिला आॕफर देतो की तो एवीतेवी महिन्याभरातच खपणारेय, तर तिने त्याच्याशी लग्न करावं म्हणजे ती त्याच्या प्रचंड संपत्तीची मालकीण होईल आणि मग जाॕन मेल्यावर तिने हेन्रीबरोबर सुखात राहावं, तिला पटतं!
त्यांचं घाईघाईत लग्न. तिथे तो 'प्रिन्स' आणि 'जुनो' आपापल्या पार्टनरच्या मागावर आलेत. लग्न उरकून जाॕन आणि मिकी पळ काढतात आणि त्या गडबडीत मिकीला भेटायला आलेला तिचा प्रियकर हेन्रीसुद्धा त्यांना जाॕईन होतो.
आणि इथून एकाहून एक धम्माल प्रसंगांना सुरुवात होते!🤣
ते ज्या हाॕटेलमधे उतरतात तिथला मॕनेजर तर वेडाच होतो की हनिमूनला आलेल्या नवरा-बायकोबरोबर बायकोचा प्रियकरदेखील आहे हे बघून! त्यानंतरचे काही प्रसंग धमाल. मिकीचं "चुंबन कसं घ्यायचं" हे तिचा नवरा जाॕन तिच्या प्रियकराला हेन्रीला शिकवतो तो सीन तर कमाल!!!! आणि पुढे तर त्यात एक अस्वलही कडमडतं!..जाॕनला डबल बेडवर मिकीऐवजी हेन्रीबरोबर झौपायला लागतं तो सीनही धुमाकूळ!🤣
दरम्यान जाॕनचा फोन टॕप करुन प्रिन्स आणि जुनो तिथे पोहोचतात..
पुढे अफलातून टर्न...इकडे मिकीला जाॕन खरंचंच आवडायला लागतो, तर हेन्रीला जून आवडायला लागते. अशातच जाॕनला कळतं की त्याचा मेडिकल रिपोर्ट चुकून अदलाबदल होऊन आलाय आणि तो काही आता मरणारबिरणार नाहीये म्हणून!
प्रिन्स त्याकाळच्या प्रथेप्रमाणे जाॕनला द्वंद्वाचं आव्हान देतो (याला "चॕलेंज" म्हणतात - हे तमाम फेसबुकवाल्यांसाठी जे 'आवाहना'ला 'आव्हान' चॕलेंज मानतात! 🙄😳😝 )
No comments:
Post a Comment